१५ मार्च ते २१मार्चपर्यत नागपुरात लॉकडाऊन- नितीन राऊत यांची घोषणा

Share This News

उपराजधानी नागपुरात १५ ते २१ मार्च दरम्यान पुन्हा कठोर लॉकडाऊन

संचारबंदी लागू राहणार, अत्यावश्यक सेवा चालू राहणार

नागपूर ःउपराजधानी नागपुरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुन्हा एका कठोर लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाणार आहे. १५ ते २१ मार्च दरम्यान लॉकडाऊन केले जाणार असल्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. या लॉकडाऊन दरम्यान कठोर संचारबंदी लागू राहणार आहे, हे विशेष.
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील तर शासकीय कार्यालयांमध्ये २५ टक्के एवढीच मर्यादित उपस्थिती ठेवली जाणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत उपराजधानीतील मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद राहतील, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले. नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात हे लॉकडाऊन लागू राहणार आहे. यात शहरासह बुटीबोरी, हिंगणा आणि कामठी परिसराचा देखील  समावेश होतो.
अत्यावश्यक उपाययोजना म्हणून आमदार निवासात पुन्हा एकदा विलगीकरण केंद्र सुरु केले जाणार आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करून कुठल्याही योग्य कारणाअभावी भटकणाऱ्या लोकांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाबाधीतांचा आकडा या वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचला असून मंगळवारी शहरात २०२१ बाधीतांची नोंद झाली. सप्टेंबर २०२० नंतर प्रथमच एका दिवसात कोरोना बाधीतांमध्ये इतकी वाढ नोंदविण्यात आली तर पाच मृत्यूची नोंद झाली. 
मागील दोन आठवड्यांपासून शहरात शनिवार आणि रविवारी अंशतः लॉकडाऊनची उपाययोजना सुरु आहे. मात्र, लोक गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव येत असून रस्त्यांवरील गर्दी कुठलेही कमी झाल्याचे चित्र दिसत नाही. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.