अर्धा युनिटमध्ये ३५ किमी धावणारी ‘मेड इन नागपूर ट्रायसिकल’

Share This News

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला साद देत व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या आव्हानाला प्रतिसाद देत नागपूरकर तरुणांनी दिव्यांगांसाठी अद्ययावत ‘ट्रायसिकल’ तयार केली आहे. विशेष म्हणजे केवळ अर्धा यूनिट वीजेमध्ये ‘फुलचार्ज’ होणारी ही ट्रायसिकल तब्बल ३५ किमी धावते. अवघ्या ४ रुपयांच्या विजेमध्ये ३५ किमी धावणार्‍या या ‘मेड इन नागपूर ट्रायसिकल’चे महापौर दयाशंकर तिवारी यांनी कौतुक केले आहे. नागपूरचा तरुण मेकॅनिकल अभियंता अनुराग चित्रिव व अभियंता अमोल उमक या तरुणांच्या ‘अनुराग इंजिनिअरींग कंपनी’द्वारे तयार करण्यात आलेली ट्रायसिकलची महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी (ता.४) मनपामध्ये पाहणी केली. यावेळी विशेषत्वाने माजी आमदार अनिल सोले व मुन्ना महाजन उपस्थित होते. लिथिमाईन बॅटरीवर संचालित ही ट्रायसिकल असून ११0 ते १२0 किमी एवढी त्याची वजनक्षमता आहे. ट्रायसिकलच्या मागील चाकाला डिस्क ब्रेक व पुढे पॉवर ब्रेक आहेत. एलईडी हेड लॅम्प व डिजिटल इंडिकेटरमुळे रात्रीही प्रवासासाठी ही ट्रायसिकल सुरक्षित ठरते. बॅटरी संपल्यास अडचण होऊ नये यासाठी ‘म्यन्यूअल’रित्या चालविण्याचीसुद्धा व्यवस्था त्यात आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.