मला बळीचा बकरा बनवला, मला NIA कोठडी नको – सचिन वाझे

Share This News

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्यप्रकरणी एनआयएने (NIA) सचिन वाझेला अटक केली आहे. १४ मार्चला त्यांना १० दिवसांसाठी म्हणजे आजपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर आज पुन्हा एकदा सचिन वाझेला एनआयए कोर्टात दाखल केले आहे. सध्या याप्रकरणी कोर्टात युक्तीवाद सुरू आहे. सचिन वाझेसाठी एनआयएकडून १५ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तर सचिन वाझेने माझा बळीचा बकरा बनवलं जातंय असा दावा कोर्टासमोर करत मला एनआयए कोठडी देऊ नका, अशी विनंती केली आहे.

सचिन वाझे कोर्टासमोर काय म्हणाले?

मला बळीचा बकरा बनवंल जातंय. मी दिड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो. अचानक मला सांगितलं की, तुझ्या विरोधात पुरावे आहेत, तुला अटक करतोय. जी काही चौकशी करायची होती ती करून झालीय, आता आणखीन पोलीस कोठडी देऊ नका, अशी वाझेने एनआयए कोर्टाकडे विनंती केली.

तसेच पुढे वाझे म्हणाले की, मला कोर्टाला आणखीन काही गोष्टी सांगायच्या आहेत. त्यावेळी कोर्टाने जे काही सांगायचंय ते लेखी देण्याचे निर्देश दिले आहे.

दरम्यान सचिन वाझेना दिलेल्या ३० काडतुसांपैकी ५ काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. देशपातळीवर वाझेंचा गुन्हा मोठा असल्याचा युक्तीवाद एनआयएच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.