आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस, महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता
विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दोन दिवसात विरोधी पक्ष सरकारला कोरोना, मराठा आरक्षण, शेतकरी मदतीवरुन घेरण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सरकार या दोन दिवसात महत्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्याच्या तयारीत आहे. यात प्रामुख्याने महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक शक्ती कायद्यासंदर्भातील विधेयकाचा देखील समावेश आहे.
आज अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस, महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी मदतीवरुन विरोधक आक्रमक होणार
दिल्लीमध्ये कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचं आंदोलन सुरू असताना कृषी कायद्याचं समर्थन करण्यासाठी रयत क्रांती आणि भाजपच्या वतीने हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बळीराजाच्या फलकाला दुग्धाभिषेक घालण्यात आला. केंद्रातील कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, त्यामुळे दलालांचे नुकसान होणार आहे. दिल्लीच्या सीमेवरचं आंदोलन शेतकऱ्यांचा नसून काँग्रेसचं आहे. अशी टीका यावेळी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड यांचीही उपस्थिती होती
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, 10 कायदे मांडण्यात आले आहेत तर दहा दिवस अधिवेशन वाढवलं पाहिजे, 10 बिलं महत्वाची आहेत, अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे रक्षणकर्ते आहात
हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात, कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच विधानसभेत गोंधळ, कमी कालावधीवरुन विरोधकांचा गोंधळ
सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वेशीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चानं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्याचा इशारा दिला. मुंबईबाहेरून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत येऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाशी आणि मानखुर्द दरम्यान नाकाबंदी केलेली आहे. संशयित गाड्यांची पोलीस तपासणी करत आहेत.
दोन दिवसीय अधिवेशनात शक्ती विधेयक आज येत आहे, गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची माहिती, सतेज पाटील म्हणाले, विरोधी पक्षाच्या अनेक महिला प्रतिनिधी यांच्याशी ही चर्चा झाली आहे
राज्य सरकारच्या हिवाळी आधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास 2500 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी 17 जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पोलिसांचा आणि काही विधानभवन कर्मचारी यांचा समावेश आहे. मागील वेळी देखील 52 जणांची कोरोना पाॅझिटिव्ह होते. मात्र यावेळी आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळतंय .
विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सहा अध्यादेश, 10 विधेयके मांडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत 200 निर्णय घेण्यात आले असून त्यातील आठ महिने कोरोनाशी झुंज देण्यात गेली आहेत. कोरोना आणि बेमोसमी पाऊस या संकटांशी सामना करीत सरकार मार्गक्रमण करीत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते.