नगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

Share This News

चहा विक्रेता कलाकार सनी माघाडे यांनी 300 रंगीत पेन्सील व 100 बॉलपेन्स च्या सहाय्याने साकारले डॉ.आंबेडकरांचे पोर्टेट
अहमदनगर, 25 मार्च :- एखाद्या विषयाची आवड, जिद्द, चिकाटी माणसाला प्रतिकूल परिस्थितीतूनही संघर्षातून यशाकडे झेपवण्याची प्रेरणा देत असते. अश्या परिस्थितीत कलेबद्दलची निष्ठा सामान्यपेक्षा काहीतरी वेगळे करून दाखविण्याची आकांक्षा मनी बाळगून चहा विक्रेते सनी भीमराव माघाडे यांनी ३०० रंगीत पेन्सिल व १०० बॉल पेनचा वापर करून साकारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्राचे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
                     

सनी माघाडे यांनी चहा विक्री करुन कलेची जोपासना केली. मोठ्या कल्पकतेने आपल्यातला वेगळेपणा दाखवत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चित्र पेन्सिल व पेनने साकारले. त्यांनी प्रगत कला महावद्यालयात डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांनी या चित्राची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत पोहोचवली आहे. त्यांचे पुढचे ध्येय गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये या चित्राची नोंद होण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सनी माघाडे यांनी कलेची साधना करताना डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या चित्रातून कलचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.या चित्राची किर्ती जगभर पसरविताना आनंद होत असून,यासाठी मोठे बंधू लक्ष्मण नथूराव माघाडे यांचे मोठे योगदान आहे.या चित्राच्या रुपाने अहम दनगरचे नाव संपुर्ण जगात उज्वल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.तर परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करण्याचे आवाहन करुन,कोरोना महामारीत जनजीवन विस्क ळीत होत असताना जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी कलेचा छंद जोपासण्याचे सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.