कोरोनामुळे महाराष्ट्र-मध्य प्रदेश बस वाहतूक बंद

Share This News

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र-मध्य प्रदेश बस वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश मध्य प्रदेशच्या अपर परिवहन आयुक्त तथा सचिवांनी गुरुवार, १८ मार्चला काढले आहेत.
नागपूर, अमरावती, अकोला, अकोट, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आदी ठिकाणाहून मध्य प्रदेशातील मुलताई, बैतूल, छिंदवाडा आदी भागात जाता येते. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सार्वजनिक बस वाहतुकीतून संसर्ग वाढण्याचा धोका पाहता मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या सार्वजनिक व खासगी बसेसला राज्याच्या सीमेवर रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर, अमरावती, अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह खासगी प्रवासी बस वाहतूकदारांना दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवास टाळावा असे आवाहनही करण्यात आले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.