देशात ३१,५२२ नवे कोरोना रुग्ण, ४१२ मृत्यू

Share This News

जिल्ह्यात ४0९ बाधित, ११ मृत्यू

नागपूर : आज १0 डिसेंबरला दिवसभरात जिल्ह्यात नव्याने ४0९ बाधितांची तर ११ कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. आज दिवसभरात जिल्ह्यात ५३३२ चाचण्या करण्यात आल्यात. यातून शहरातील ३0४, ग्रामीणचे १0१ व इतर जिल्ह्यातील ४ अशा ४0९ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. गेल्या ११ मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रकोप अद्यापही जिल्ह्यात कायमच आहे. सप्टेंबरच्या तिसर्‍या आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली होती. परंतु, दिवाळीनंतर पुन्हा बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागामध्ये होणारी ही रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर घालणारी ठरत चालली आहे.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ४0९
भंडारा – ७१
चंद्रपूर – ९६
गोंदिया – २७
गडचिरोली – ५0
वाशीम – १७

यवतमाळ – ३९
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात ३१,५२२ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४१२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३७,७२५ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे ९७,६७,३७२ रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या ३,७२,२९३ झाली आहे . एकूण ९२,५३,३0६ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,४१,७७२ पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली.
भारतात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात येत आहे. देशातील एकूण कोरोनारुग्णांची संख्या ९७ लाख ६७ हजार ३७१ एवढी झाली आहे. यातील ९२ लाख ५३ हजार ३0६ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.