नंदुरबार : बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Share This News

नंदुरबार, ०५ नोव्हेंबर : पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण अधिकार्‍यांनी करावे, असे निर्देश पाडवी यांनी दिले. त्यांनी शेतकर्‍यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच किटकनाशकांची फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या. संकट काळात शासन शेतकर्‍यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.