Maharashtra Assembly कांदा निर्यात, इथेनॉलच्या प्रश्नावर दिल्लीत मार्ग काढू-अजित पवार

0

NAGPUR नागपूर-कांद्यावरील निर्यात बंदी आणि ऊसापासून इथेनॉल तयार करण्यास बंदीच्या निर्णयांचा मुद्दा शुक्रवारी विरोधी पक्षांनी विधानसभेत उपस्थित केला. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले या नेत्यांनी हा प्रश्न उपस्थित करुन शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर यासंदर्भात आपली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाल्याचे व त्यांच्या लक्षात हा मुद्दा आणून दिल्याचे सांगितले. या दोन्ही मुद्यांवर दिल्लीत जाऊन आपण तोडगा काढू असे आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिले. (Winter Assembly Session-2023)

अजित पवार म्हणाले की, मराठा आरक्षण, शेतकरी किंवा ऊसाचा प्रश्न असेल हे महत्त्वाचे आहेत. या मुद्यांवर चर्चा करण्यस राज्य सरकरची तयारी आहे. ते म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. या संदर्भात पियुष गोयल यांच्या सोबत ही बोलण झाले आहे. अनेकानी कर्ज घेऊन प्लांट उभा केला आहे. नागपुरात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून त्यांची शनिवारी किंवा रविवारी भेट घेणार आहे. जर मार्ग निघाला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊन मार्ग काढू. कांदा उत्पादक, शेतकरी यांच्या संदर्भातही चर्चा केली जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, जयंत पाटील या सदस्यांनी सभागृहाचे लक्ष कांदा निर्यात बंदी तसेच ऊसापासून इथेनॉल निर्मितीला बंदी घालण्याच्या निर्णयाकडे लक्ष वेधले. नाशिक परिसरात कांदा उत्पादकांनी हायवे जॅम केले आहेत व ते रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी व तातडीने हा प्रश्न सोडवावा, असे या नेत्यांनी सांगितले. ऊसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले. ऊस उत्पादक तसेच कारखान्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

दूध उत्पादकांचाही प्रश्न

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी दूध उत्पादकांचा मुद्दा मांडला. सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे उभा राहत नाही. दर खाली आले असताना मंत्री महाराष्ट्राच्या दुधात भेसळ असल्याचा सांगून राज्याची करत आहे, असा आरोपह त्यांनी केला.