मसाला किंग’ MDH मसाल्याचे चेअरमन महाशय धरमपाल गुलाटी यांचे निधन

Share This News

कोरोना वायरसने संक्रमित झाले होते. यातून बरे झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मागील वर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

एमडीएचच्या प्रत्येक जाहिरातीत दिसणारे आजोबा धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. धरमपाल गुलाटी यांनी ३ डिसेंबरला सकाळी ५.३८ वाजता दिल्लीच्या माता चंदन देवी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. कोरोना वायरसने संक्रमित झाले होते. यातून बरे झाल्यानंतर गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचं निधन झालं.

धर्मपाल गुलाटी यांचा मसाल्याचे दुकानदार ते उद्योजक असा प्रवास थक्क करणारा होता. ते 2000 कोटी रुपयांच्या बिजनेस ग्रुपचे मालक होते. महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 रोजी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला होता. इथेच त्यांच्या व्यवसायाचा पाया रचला होता. त्यांनी आपल्या आयुष्यात फाळणीचं दु:ख, गरिबी पाहिली, टांगा चालवला आणि त्यानंतर मसाल्याचं दुकान सुरु केलं. त्यांच्या मेहनत आणि जिद्दीमुळेच ते मसाला किंग बनवलं. 1947 मध्ये देशाच्या विभाजनानंतर ते भारतात आले होते. या दुकानानंतर त्यांच्या मसाल्यांचा व्यवसाय वाढत गेला. आज भारत आणि दुबईमध्ये त्यांच्या मसाल्याचे कारखाने आहेत. या कारखान्यात तयार झालेले एमडीएच मसाले जगभरात पोहोचवले जातात. एमडीएचची 62 उत्पादनं आहेत.

धर्मपाल गुलाटी यांनी त्यांच्या वडिलांच्या नावानं महाशय चुन्नीलाल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. ही ट्रस्ट २५० बेडचं रुग्णालय, झोपडपट्टी वासियांसाठी मोबाईल रुग्णालय आणि ४ शाळा चालवतं.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.