नागपूर महापालिकेच्या नऊ झोनमध्ये महिलाराज !
नागपूर महापालिकेच्या दहापैकी ९ झोन सभापतीपदी महिला नगरसेवकांची निवड झाली आहे. यात भाजपला अपेक्षेप्रमाणे ९ सभापतिपदांवर विजय मिळाला आहे. धरमपेठ झोन मधून भाजपचे सुनील हिरनवार हे एकमेव पुरुष झोन सभापति म्हणून निवडून आले आहेत. महापालिकेच्या दहा झोन सभापती पदासाठी आज निवडणूक पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. संख्याबळाचा विचार करता ८ झोन मध्ये भाजपचे सभापति निवडणून येणार हे निश्चित होते. अशात आसीनगर झोनमध्ये गेल्यावेळी बसपचा सभापती निवडून आला होता. परंतु यावेळी बसपचे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे बसपच्या अधिकृत उमेदवार वंदना चांदेकर यांची उमेदवारी धोक्यात आली होती. परंतु मोहम्मद जमाल निवडणुकीत तठस्थ राहिल्याने बसपच्या वंदना चांदेकर विजयी झाल्या. बसपच्या वंदना चांदेकर यांना ६ तर भाजपच्या भाग्यश्री कानतोडे यांना ३ मते प्राप्त झाली. मंगळवारी झोन मधून भाजपच्या प्रमिला मथराणी विजयी झाल्या. येथून कॉँग्रेसच्या उमेदवार साक्षी राऊत यांनी माघार घेतली.
निवडणुकीचा निकाल –
लक्ष्मीनगर झोन – पल्लवी शामकुळे पन्नासे
धरमपेठ – सुनील हिरनवार
हनुमान नगर – कल्पना कुंभलकर
धंतोली – वंदना भगत
नेहरूनगर – स्नेहल बिहारे
गांधीबाग – श्रद्धा पाठक
लकडगंज – मनीषा अतकरे
मंगळवारी – प्रमिला मथराणी
सतरंजीपुरा – अभिरुची राजगिरे
आसिनगर – वंदना चांदेकर (बसप)