नागपूर महापालिकेच्या उपमहापौर पदी मनीषा धावडे विजयी
नागपूर महापालिकेच्या महापौर पदी दयाशंकर तिवारी यांच्या विजयानंतर उपमहापौर पदीही भाजपच्या नगरसेविका मनीषा धावडे विजयी झाल्या आहेत. मनीषा धावडे यांना १०७ तर महाविकास आघाडीच्या रश्मी धुर्वे यांना २६ मतं प्राप्त झाली.तर बहुजन समाज पक्षाच्या वैशाली नारनवरे यांना १० मतं मिळाली. करोना चे संकट पाहता पहिल्यांदाच महापौर व उपमहापौर पदासाठी ऑनलाईन निवडणूक घेण्यात आली. प्रशासनाच्या ऑनलाईन निवडणूक प्रक्रियेवर अगोदरच सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला होता. निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाईन घेतल्याने या प्रक्रियेसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला. उपमहापौर पदाच्या निवडणुकीवेळी सभागृहातील सहा सदस्य अनुपस्थित राहिले. आभा पांडे,किशोर कुमेरिया,पुरुषोत्तम हजारे,गार्गी चोपरा,बंटी शेळके व कमलेश चौधरी हे सदस्य अनुपस्थित राहिले.