विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुन्हा मनोहर म्हैसाळकर, विलास मानेकर सरचिटणीस

Share This News

नागपूरः विदर्भातील मराठी साहित्य क्षेत्रातील अग्रणी संस्था विदर्भ साहित्य संघाचे नवे कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले असून मनोहर म्हैसाळकर यांच्याकडे चौथ्यांदा संघाचे अध्यक्ष म्हणून धुरा आली आहे तर सरचिटणीसपदाची जबाबदारी पुन्हा एकदा विलास मानेकर यांच्याकडे आली आहे.
विदर्भ साहित्य संघाच्या प्रथेनुसार नव्या आणि जुन्या कार्यकारी मंडळाची संयुक्त सभा सध्याच्या लॉकडाऊनमुळे आयोजित करणे शक्य नसल्याने २०२१-२६ या काळासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीतून पदाधिकारी आणि विविध समित्यांचे आमंत्रक आमि सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याचे विदर्भ साहित्य संघाने स्पष्ट केले आहे. मनोहर म्हैसाळकर यांच्यावर पुन्हा चौथ्यांदा विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून धुरा आली आहे. तर विलास मानेकर यांच्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी पुन्हा आली आहे. कार्याध्यक्ष म्हणून डॉ.रवींद्र शोभणे यांची तर अन्य दोन उपाध्यक्ष म्हणून यवतमाळचे डॉ.रमाकांत कोलते आणि नागपूरचे डॉ.राजेंद्र डोळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.रवींद्र शोभणे यांच्यावर विदर्भ साहित्य संमेलनांचे आमंत्रक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.कोषाध्यक्षपदी विकास लिमये, कार्यालय चिटणीस म्हणून नितीन सहस्त्रबुद्धे, सार्वजनिक न्यास आणि अर्थविषयक चिटणीस म्हणून प्रदीप मुनशी, शाखा समन्वय चिटणीसपदी प्रदीप दाते, युगवाणीचे संपादक म्हणून प्रफुल्ल शिलेदार, परीक्षा समिती संचालक म्हणून भाग्यश्री बनहट्टी, ग्रंथालय संचालक म्हणून डॉ. विवेक अलोणी, सांस्कृतिक संकुल संचालकपदी उल्हास केळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साहित्यिक उपक्रमाचे सदस्य म्हणून डॉ. तीर्थराज कापगते, सांस्कृतिक उपक्रम सदस्यपदी उदय पाटणकर आणि शताब्दी समितीच्या मार्गदर्शक म्हणून संयोगिता धनवटे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे विदर्भ साहित्य संघाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शताब्दी समिती तयार होतेय
पुढील वर्षापासून विदर्भ साहित्य संघाचे शताब्दी वर्ष सुरू होत आहे. त्यासाठी शताब्दी समिती स्थापन करण्यात येत असून सुकाणू समितीचे मार्गदर्शक म्हणून मनोहर म्हैसाळकर, डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ.राजन जयस्वाल हे राहणार आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.