विधान परिषदेत अनेक आमदार मास्कविना Many MLAs in the Legislative Council without masks

Share This News

मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सभागृहात बसणारे अनेक आमदार मास्कचा वापर करीत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंगळवार, ९ मार्चला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी ही बाब आमदारांच्या लक्षात आणून दिली.


अर्थसंकल्पावर विधान परिषदेत मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेही सभागृहात होते. परंतु अनेक सदस्य सभागृहात आल्यानंतर मास्क लावत नसल्याचे डॉ. गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणले. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेतील आमदारांना मास्क लावण्याची सूचना केली. आमदारांना सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येकाचे आरोग्य कोरोनाकाळात महत्त्वाचे आहे, असे नमूद करीत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व आमदारांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला. दरम्यान विधान सभेतील ३६ कर्मचाऱ्यांना सोमवारी कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे विधानभवन परिसरात खळबळ उडाली आहे. परिणामी विधानभवनातील मर्यादीत प्रवेश आणखी मर्यादीत करण्यात आला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.