मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे.
नामदेव पायरीपासून आक्रोश दिंडीला सुरुवात, बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना.
पंढरपूर :. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे (Maratha Samaj Akrosh Morcha From Pandharpur To Mumbai Mantralay).
पंढरपूर प्रशासनाने केलेलं आवाहन धुडकावत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज बांधव ते पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर ते पाय मुंबई पायी दिंडी काढू नये, यासाठी काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत.पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे.