मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप 28 जानेवारीस

Share This News

राज्य मराठी वाङमय पुरस्काराची होणार घोषणा

मुंबई,  : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता 28 जानेवारी रोजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या 34 पुरस्कारांची घोषणा यावेळी केली जाणार आहे.मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी लिहिलेल्या साहित्याचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मांडले जाणार आहे. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधानमंडळातील मराठी भाषा समिती प्रमुख चेतन तुपे व इतर सदस्य, या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजित डिसले हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

दि. 14 जानेवारी पासून सुरु झालेला हा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमाने संपन्न झाला. राज्य शासनासोबतच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापिठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा निमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.