मराठवाडा, विदर्भासह घाटमाथ्यावर पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा इशारा

Share This News

मुंबई, २७ जानेवारी : येत्या गुरुवारी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये आणि घाटमाथ्यावर पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील वातावरणातही बदल होण्याची शक्यता आहे. 
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान याआधी पुढच्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांत कडाक्याची थंडी पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांवरही अवकाळी पावसाचे सावट

गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार हवामानात बदल होत आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे वातावरण तयार झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम हवामानावर होत आहे. त्यामुळे थंडी आणि पाऊस असे वातावरण सध्या सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांवरही या अवकाळी पावसाचे सावट आहे.

कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.