मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण महिना

Share This News

नवी दिल्ली, ०६ एप्रिल : मागील 121 वर्षांच्या इतिहासात मार्च तिसरा सर्वात उष्ण महिना ठरल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मार्चमध्ये संपूर्ण देशाचे कमाल सरासरी तापमान 32.65 डिग्री सेल्सियस होते, अशी माहिती हवामान विभागाच्या आढावा बैठकीत समोर आली. त्यामुळे मार्च महिना ऐतिहासिकदृष्ट्या उष्ण ठरला.यंदा मार्च महिन्यातच मे महिन्याप्रमाणेच उन्हाळा जाणवला. मार्चमध्ये देशातील अनेक भागात तापमान 40 डिग्री सेल्सियसवर पोहोचले होते. होळीच्या दिवशी दिल्लीच्या सफदरजंगमध्ये सर्वाधिक 40.1 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. हे 1945 नंतर मार्चमधील सर्वाधिक तापमान ठरले आहे. 76 वर्षांत पहिल्यांदाच मार्चमध्ये दिल्लीचे तापमान 40 च्या पार गेल्याचे समजते. हवामान जाणकारांच्या मते, यापूर्वी मार्चमध्ये असे कधीही झाले नव्हते.पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व राजस्थान, तामिळनाडू आणि विदर्भासहित महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.