‘ मास्टर ’ शुक्रवारी एमेझॉन प्राईमवर ‘Master’ on Amazon Prime on Friday
अभिनेते थलापती विजय आणि विजय सेतुपती यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित, बहुभाषिक चित्रपट ‘ मास्टर ’ शुक्रवारी एमेझॉन प्राईम वर प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी चित्रपटाची नवीन झलक प्रदर्शित करण्यात आली. चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनगराज आहेत तर संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे.
जागतिक कोरोना संकटाच्या छायेत तसेच संक्रांती-पोंगलनिमित्त अभिनेते विजय आणि विजय सेतुपती यांचा बहुभाषिक ‘ मास्टर ’ चित्रपट 13 जानेवारीला चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. तामिळनाडू सरकारने राज्यात सर्व प्रकारच्या चित्रपटगृहांची आसन क्षमता 50% ठेवली आहे. चित्रपटगृहांना केंद्र आणि राज्यांच्या कोरोना विषयक सर्व दिशानिर्देश आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.