इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्सीबिशनचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले उद्घाटन

Share This News

इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल एक्सीबिशन (आयआयटीई) या संस्थेच्या वतीनं नागपूर येथे यात्रा व पर्यटनावर आधारित प्रदर्शन दि. 5, 6 व 7 फेबु्रवारी रोजी द इन्स्टिटयुट ऑफ फ इंजिनियर्स हाॅल, अलंकार चोक क, उत्तर अंबाझरी मार्ग, नागपूर  येथे ‘इंडिया प्रिमियर टॅव्हल अण्ड टुरिझम’  प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 11 ते सायं. 7 पर्यंत असणार आहे. आयआयटीई ही संस्था यात्रा, पर्यटन, रेल्वे पर्यटन, आदरातिथ्य आदि सेवा देणारी भारतातील एक संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय बंगरूळ येथे आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन आज नागपूर नगरीचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मध्य प्रदेश टुरिझम चे महाव्यवस्थापक युवराज पडोळे, गुजरात टुरिझम चे बकुल अतगामकर, हिमाचल टुरिझम चे अरुण खाडपकर, छत्तीसगड टुरिझम चे सी. एम. शर्मा, व आय आय टी ई चे अनुराग गुप्ता तसेच अनेक पर्यटन प्रेमी उपस्थित होते.

महापौर दयाशंकर तिवारी यांनी आयोजनाची प्रशंसा करून गेल्या चौदा वर्षापासून सतत हे प्रदर्शन आयोजित असल्यामुळे आयोजकांचे अभिनंदन करून पुढल्या वेळेस या प्रदर्शनीचे आयोजन नागपूर महानगरपालिकेच्या सहयोगाने करण्यात यावे व त्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, व जास्तीत नागपूरकरांनी या आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळे, हाॅटेल्स, रिसाॅर्टस आणि त्याच्याशी संबंधित इतर सेवा, टुर आॅपरेटर्स या संबंधीची सविस्तर माहिती मिळेल. तसेच पर्यटन उद्योगाशी संबंधित इतर महत्वपूर्ण बाबींवरही मागर्दर्शन प्राप्त करता येईल. हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी 11 ते 7 या वेळेत खुले राहील. या प्रदर्शनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनाला चालना देण्यास मदत होईल, अशी संस्थेला आशा आहे. आगामी काळात देशांतर्गत पर्यटन व्यवसायात नागपूर शहराची महत्वाची भूमिका राहील असा संस्थेचा विश्वास आहे. त्यामुळे पर्यटनाबाबत सामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, हा या प्रदर्शनामागचा हेतु आहे.

आयआयटीईद्वारे उन्हाळी सुट्ट्यांसह अन्य प्रसंगांसाठी ग्राहकांपुढे पर्यटनाचे उत्तमोत्तम पर्याय उपलब्ध करुन देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना कमी वेळात, कमी खर्चात पर्यटनाचा अधिकाधिक आनंद देण्यावर संस्थेचा भर आहे, असे आयआयटीईचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग गुप्ता यांनी सांगितले. आयआयटीईच्या या प्रदर्शनात गुजरात टुरिझम, मध्य प्रदेश टुरिझम, हिमाचल प्रदेश पर्यटन विभाग, छत्तीसगड टुरिझम, थाॅमस कुक, सफारी प्लस, महिंद्रा हाॅलीडे्ज, ताडोबा टायगर व्हॅली रिसोर्ट, एक्सपोव्हा डेस्टीनेशन प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यांचा सहभाग असणार आहे. या कंपन्यांच्या स्टाॅल्समुळे प्रदर्शनाच्या विविधतेत भर पडेल. तसेच त्यामुळे ग्राहकांना पर्यटन स्थळे, तिथल्या सोयी, सुविधा आणि आॅपरेटर्सच्या बाबतीत अनेक पर्याय उपलब्ध होतील. या प्रदर्शनामुळे केवळ नागपूरच नव्हे तर आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी देश-विदेशातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांची माहिती मिळू शकेल. अधिक माहितीसाठी आयआयटीई चे संचालक अनुराग गुप्ता यांच्याशी संपर्क साधता येईल.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.