एमबीबीएसच्या परीक्षा जूनमध्ये होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची माहिती

Share This News

नागपूर: कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व स्वरुपाची असून त्याचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण येतो आहे. सध्या ३६ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ही दिलासा देणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात हळुहळु परिस्थिती नियंत्रणात येत असून सरकारने मोठ्या प्रमाणात लसीकरणाची तयारी सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.