कोरोनाला नैसर्गिक आपत्ती जाहीर करा, मुख्यमंत्र्यांचे मोदींना साकडे|Medical Education Minister Amit Deshmukh’s announcement that the examination of medical students is likely to be held in June

Share This News

मुंबईः कोरोना संसर्गाची आपत्ती ही नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याची विनंती केली आहे. भूकंप, अवर्षण, पूर आल्यास या घटना नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करून प्रभावित लोकांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे कोरोनाच्या संकटाला देखील आपण नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वीकारले आहे. या आपत्तीमुळे अनेकांची उपजिवीका संकटात सापडली आहे. मात्र, कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर केलेले नसल्याने प्रभावित वर्गाला वैयक्तिक स्वरुपात मदत देता येत नाही. त्यामुळे केंद्राच्या पातळीवर कोरोनाला नैसर्गिक आपत्ती जाहीर करावे. त्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलून मदतही करायला हवी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.