वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा लांबणीवर, जूनमध्ये होण्याची शक्यता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची घोषणा|Medical Education Minister Amit Deshmukh’s announcement that the examination of medical students is likely to be held in June

Share This News

लातूर- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता जून महिन्यात घेण्यात येणार असून त्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वतीने जाहीर होणार आहे.
राज्याच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्या सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय परीक्षा याच महिन्यात १९ एप्रिलपासून सुरु होणार होत्या. मात्र, सध्याच्या संकटात त्या घेणे शक्य नसल्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांशी चर्चा करून हा निर्णय जाहीर केला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.