लॉईड ऑस्टिन-राजनाथ सिंह यांच्यात बैठक सुरू

Share This News

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. ऑस्टिन दिल्लीतील विज्ञान भवनात दाखल झाले असून, तेथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत चर्चेला सुरूवात झाली आहे. या चर्चेला तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख उपस्थित आहेत. या चर्चेत चीनची दादागिरी, अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि शांतता चर्चेचे आव्हान, 30 प्राणघातक शिकारी ड्रोन आणि 114 अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.