चंद्रपूर : एसटी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कामगार सेनेची परिवहन मंत्र्यांसोबत बैठक

Share This News

आज रोजी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते तथा पक्ष प्रवक्ते मा.खा. अरविंदजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सरचिटणीस मा. हिरेनजी रेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री मा.ना. अँड अनिलजी परब यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष माजी खासदार अरविंदजी सावंत यांनी इतिहासात पहिल्यांदाच एसटी कर्मचार्‍यांच्या नियमीत वेतनासाठी एसटी महामंडळाला कोणत्याही प्रतिपूर्ती शिवाय १,000 कोटींचे आर्थिक पॅकेज दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा.ना. उद्धव साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री मा.ना. अजीत दादा पवार यांचे आभार मानले तर १ हजार कोटींचे पॅकेज मिळवण्यासाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्या बद्दल परिवहन मंत्री तथा अध्यक्ष मा.ना.अँड. अनिलजी परब यांचे विशेष आभार मानले आहे. यावेळी कोषाध्यक्ष राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उतेकर, महिला संघटक स्मिता पत्की, कार्यालय प्रमुख रविंद्र चिपळूण सह कोषाध्यक्ष प्रमोद मिस्त्री उपस्थित होते.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने वेळोवेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तसेच परिवहन मंत्री मा. ना. अँड अनिलजी परब यांना दिलेल्या पत्रावर चर्चा करण्यासाठी पत्र देऊन वेळ मागीतली होती त्याअनुषंगाने परिवहन मंत्र्यांनी आज महाराष्ट्र एसटी कामगार सेनेला पाचारण करुन बैठक आयोजित केली. या बैठकीत एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर मॅरेथॉन चर्चा झाली.
कामगार सेनेने पत्राद्वारे सूचविलेल्या मुद्दांवर मॅरेथॉन चर्चा झाली. सर्व एकुण एक कामगार हिताच्या मुद्द्यांना परिवहन मंत्री मा.ना. अँड अनिलजी परब यांनी थेट मान्यता दिली. तसेच वैद्यकिय बिलांच्या प्रतिपुर्ती ऐवजी मेडिक्लेम योजना एसटी महामंडळाच्या कर्मचा?्यांना लागु करण्याबाबत प्राथमिक स्वरुपाची चर्चा ही यावेळी करण्यात आली आहे.
सांगली सातारा व कोल्हापूर विभागात अतिरिक्तच्या नावाखाली अन्याय कारक बदल्या व सेवा स्थगिती झालेल्या लिपीक टंकलेखक पदाच्या कर्मचार्‍यांनी परिवहन मंत्री मा.ना. अँड अनिल परब यांची महाराष्ट्र एसटी कामगार सेनेसमवेत भेट घेवुन अन्यायकारक झालेल्या बदल्या रद्द करुन सेवा स्थगिती उठविण्यासाठी संयुक्त निवेदन दिले. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस मा. हिरेनजी रेडकर यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर कोणत्याही विभागात असा प्रकार घडलेला नसतांना फक्त या तीनच विभागात हा प्रकार घडल्याचे व ऐन कोरोना संसगार्चा प्रसार राज्यात थैमान घालत होता त्याच वेळी या कर्मचा?्यांना कार्यमुक्त केल्यामुळे मानुसकीला काळीमा फासणारी घटना या तीन विभागात घडल्याचे परिवहन मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणुन दिले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश देवुन लवकरच न्याय देण्याचे यावेळी परिवहन मंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूर विभागातून आलेल्या कर्मचार्‍्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.