रविवारी ठाणे-कल्याण अप व डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

Share This News

मुंबई, मध्य रेल्वे दि. १३.१२.२०२० रोजी उपनगरी भागांवर देखभाल काम करण्यासाठी मेगा ब्लॉक नियोजित करणार आहे.

 ठाणे – कल्याण अप व डाउन  जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत  


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ वाजेपर्यंत सुटणा-या जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल व ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या सर्व  स्थानकांवर थांबेल.  

कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ वाजेपर्यंत सुटणा-या अप जलद सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असून कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील व  पुढे निर्धारित थांब्यांवर थांबतील.

 पनवेल – वाशी अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत
 (बेलापूर / नेरुळ-खारकोपर मार्गासह)


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने पनवेल / बेलापूर येथून सकाळी १०.४९ ते दुपारी ४.०१ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत सुटून पनवेल / बेलापूरला जाणा-या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.३३ या वेळेत ठाणेकडे जाणा-या  सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत विशेष उपनगरी रेल्वे गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात चालविण्यात येतील.

 ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत.  प्रवाशांना होणा-या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.