मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोना संसर्ग
हैदराबाद, 9 नोव्हेंबर :: अभिनेते मेगास्टार चिरंजीवी-यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत अधिकृत माहिती ट्वीटरद्वारे एका निवेदनाद्वारे चिरंजीवी यांनी जाहीर केली .ते म्हणाले, “ आचार्य चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी कोरोना नियम म्हणून चाचणी केली. दुर्दैवाने मला मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या मी गृहविलागीकारणात असून मला लक्षणं नाहीत. तरीही गेल्या पाच दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करून स्वतःला विलागीकृत करावे. माझ्या आरोग्याविषयी योग्य माहिती लवकरच कळवील.”
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत आणि देशव्यापी संचारबंदीनंतर जवळपास 10 महिन्यानंतर मेगास्टार चिरंजीवी- दिग्दर्शक शिवा कोरटाला यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘आचार्य’ चित्रपटाचे चित्रीकरण सोमवार 9 नोव्हेंबर पासून हैदराबाद येथे पुन्हा सुरु होणार होते . कोरोना संकटात सर्व प्रकारची काळजी घेत केंद्र आणि राज्य सरकरच्या सर्व आरोग्य विषयक नियम आणि दिशानिर्देशांचे पालन करीत चित्रीकरण पुन्हा सुरु होणार होते. मात्र मेगास्टार यांना कोरोना संसर्ग झाल्यामुळे याबाबत साशंकता आहे.काही दिवसापूर्वी या संदर्भात कोनिडेला प्रो निर्मिती संस्थेने ट्वीटरद्वारे माहिती दिली होती. “ संचारबंदी नंतर सोमवार 9 नोव्हेंबर पासून सर्व खबरदारीसह पुन्हा चित्रीकरणास आम्ही सिद्ध आणि उत्सुक असून हे एक महिन्याचे दीर्घ चित्रीकरण असणार आहे. या काळात बहुतांश चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होईल. मेगा मास चित्रपट ‘आचार्य’ 2021 च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होईल. ”
ऑगस्ट महिन्यात गणेश चतुर्थी आणि माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ अभिनेते मेगास्टार चिरंजीवी यांच्या 65 व्या जन्मदिनाचे निमित्त साधत मेगास्टार चिरंजीवी- दिग्दर्शक शिवा कोरटाला यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘आचार्य’ चित्रपटाचे अधिकृत शीर्षक ,पहिली झलक आणि मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले . ‘ चिरू 152’ म्हणजेच आचार्य साठी मेगाचाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते मेगास्टार चिरंजीवी पहिल्यांदाच दिग्दर्शक शिवा कोरटाला यांच्या सोबत एका सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात दिसणार आहेत.
लेखक-दिग्दर्शक शिवा कोरटाला यांनी मिर्ची, श्रीमंतूडु , जनता गराज, भरत अने नेनु सारख्या चित्रपटाद्वारे प्रभास , महेश बाबू आणि ज्युनिअर एन टी आर सारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मेगास्टार चिरंजीवी आणि शिवा कोरटाला पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत. चित्रपटाची निर्मिती मॅटीनी एंटरटेनमेंट निर्मिती संस्था तसेच अभिनेते आणि चिरंजीवी यांचे पुत्र राम चरण यांच्या . कोनिडेला प्रो निर्मिती संस्थेच्या अंतर्गत केली जाणार. संगीत दिग्दर्शक मणी शर्मा असणार आहेत. मार्च पर्यंत चित्रपटाचे काम सुरु होते मात्र जागतिक कोरोना संकटामुळे चित्रीकरण थांबले आहे. अभिनेत्री त्रिशा कृष्णन याचित्रपटाचा भाग होणार होत्या परंतु कलात्मक मतभेदांमुळे त्यांनी या चित्रपटातून माघार घेतली. सैरा नरसिंह रेड्डी नंतर मागील वर्षी विजयदशमीचा मुहूर्त साधत मेगास्टार चिरंजीवी तसेच दिग्दर्शक शिवा कोरटाला यांच्या चित्रपटासाठी ‘ चिरू 152’ अधिकृत पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मागील वर्षी 2 ऑक्टोबरला ‘ सै रा नरसिंह रेड्डी ‘ जगभरात प्रदर्शित झाला.सर्व स्तरातून आणि सर्व भाषांमध्ये चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभला .सै रा मेगास्टार चिरंजीवी यांचा 151 चित्रपट होता. या भव्य चित्रपाटात तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपट क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश करण्यात आला . चित्रपटात चिरंजीवी, अभिताभ बच्चन, अभिनेत्री नयनतारा, किच्चा सुदीप, विजय सेतुपती, जगपती बाबु, तमन्ना भाटिया, रवी किशन सहित अनेक मोठमोठे कलाकार सामिल होते. चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले असून निर्मिती अभिनेते राम चरण यांनी कोनिडेला निर्मिती संस्थेच्या अंतर्गत करण्यात आली. हिंदी प्रदर्शनाची जबाबदारी फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेन्मेंट आणि अनिल थडानी यांच्या ए. ए फिल्म्सने घेतली आहे. अमित त्रिवेदी मेगास्टार चिरंजीवी यांच्या ‘ सै रा नरसिंह रेड्डी ‘ द्वारे चित्रपाटात तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत एकसाथ धमाकेदार पदार्पण केले. सैरा नरसिंह रेड्डी ऍमेझॉन प्राईम वर उपलब्ध आहे.