स्वप्नांला भरारी देणारे केबीसी च्या पडद्यावर चमकणार मेळघाटातील पद्मश्री दाम्पत्य.
डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे झळकणार आहे छोट्या पडद्यावर
धारणी,
महानायक ‘अभिताभ बच्चनच्या कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात लवकरच मेळघाटातील डॉ. रवी व डॉ. स्मिता कोल्हे झळकणार आहे. केबीसीकडून विशेष चित्रणासाठी मंगळवारी पथक धारणीत पोहचले.
राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक पसंतीच्या केबीसीच्या एका विशेष भागामध्ये अमिताभ यांच्यासमोर हॉटसिटवर धारणी तालुक्यातील डॉ. कोल्हे दाम्पत्य बसून महानायकाच्या कठीण प्रश्नांना सोपी उत्तरे देणार आहेत. केबीसीच्या माध्यमाने मेळघाटातील आदिवासींची जीवनशैली, आगळ्या-वेगळ्या परंपरा आणि समस्यांचे चित्रण रवी तथा डॉ.स्मिता कोल्हे मांडणार आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त कोल्हे यांना गेल्या वर्षी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आल्यानंतर कौन बनेगा करोडपती ग्रुपच्या कक्षात रवी व स्मिता बसलेले होते. यापूर्वी धारणी येथील शिक्षक क्षीरसागर हे केबीसीच्या हॉटसिटवर पोहचलेले होते. कोल्हे दाम्पत्याच्या मेळघाटातील सामाजिक कार्याच्या चित्रिकरणारसाठी एक पथक बैरागड येथे दाखल झालेले आहे. पुढच्या महिन्यात के.बी.सी.चा स्पेशल एपिसोड सोनी टीव्हीवर प्रसारित होणार असल्याने संपूर्ण विदर्भात उत्सुकता व्यक्त होत आहे.