न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोचे मॉक ड्रिल

Share This News

नागपूर
महा मेट्रोच्या न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळ महा मेट्रोच्यावतीने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. महामेट्रोच्यावतीने आजपावतो ३00 वर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात अलेले आहेत. मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर नेमके काय करावे, कशी तयारी असावी, प्रवाशांचे सुरक्षा कशी करण्यात यावी, याबाबतचे मॉक ड्रिल यावेळी करण्यात आले.
मॉक ड्रिलनुसार, सायंकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास महा मेट्रोच्या एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथून खापरी मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाणार्‍या ट्रेनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड आढळून येतो. एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या दरम्यान मेट्रोट्रेन थांबल्यानंतर अचानक खळबळ उडाल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. तेवढय़ात ट्रेन ऑपरेटर ने कॅबिन येथून माईकद्वारे प्रवाशांना तांत्रिक बिघाडाची माहिती देतो. थोड्यावेळात दुसर्‍या ट्रेनच्या सहाय्याने ओढून पहिल्या मेट्रो स्थानकापर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात येते. यानंतर प्रवासी सुखरूप पोहचतात. तांत्रिक बिघाडामुळे थांबलेल्या मेट्रो ट्रेनला ओढून नेण्याकरिता खापरी मेट्रो स्टेशन येथून दुसरी मेट्रो ट्रेन ७ मि.मध्ये घटनास्थळी पोहोचली व ट्रेनला एकमेकांशी जोडण्यात आले. त्यानंतर मेट्रो ही नजीकच्या स्थानकावर पोहचली. प्रवासी उतरल्यानंतर बिघाड दुरुस्तीकरिता गाडी मिहान डेपोत पाठविण्यात आले. दुसर्‍या मेट्रो गाडीने पुढील प्रवास सुरू झाला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.