मेट्रोचे शिल्पकार ई श्रीधरन करणार भाजप प्रवेश
आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रथितयश अधिकारी आणि भारतात मेट्रोचे शिल्पकार मेट्रो मॅन ई श्रीधरन आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात करणार आहेत. ई श्रीधरन 21 फेब्रुवारीला भाजपात अधिकृत प्रवेश करतील. केरळ भाजप प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या विजय यात्रेदरम्यान हा पक्षप्रवेश कार्यक्रम होईल. ई श्रीधरन यांना भारतातील मेट्रोचे शिल्पकार मानले जाते.
केरळमध्ये निवडणुकीत मुख्य लढत सताधारी एलडीएफ, कॉंग्रेस प्रणीत युडीएफ आणि भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहे . एप्रिल-मे महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भाजपला केरळमध्ये फारसे यश प्राप्त झाले नाही. सध्या भाजपचे ओ राजगोपाल हे एकमेव आमदार आहेत तर केंद्र सरकारमध्ये व्ही मुरलीधरन परराष्ट्र व्यवहार आणि संसदीय कामकाज मंत्री आहेत.
आपल्या कोची प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळ भाजपच्या पदाधिका-यांची भेट घेतली तसेच आगामी केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर केरळच्या प्रमुख पदाधिका-यांशी संवाद साधला तसेच विधानसभा निवडणुकीसाठीच्या तयारीची समीक्षा केली तसेच सविस्तर आढावा आणि माहिती घेतली होती.