काय म्हणाल्या पत्नी मिशेल ओबामा ?…

Share This News

Michelle Obama

मुंबई : बराक ओबामांची ओळख जगाला आहे. पण कुशाग्र बुद्धीमत्तेची महिला म्हणून  (Michelle Obama) यांची ओळख आहे. त्यातल्या त्यात एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं याचं उदाहरणच मिशेल ओबामा प्रत्येक वेळेस घालून देतात. बरं त्या मोजूनमापून बोलतात. असाच एक प्रश्न त्यांना  एका मुलाखतीत विचारला गेला आणि त्याच्या उत्तराची आता जगभर चर्चा होती आहे.(Michelle Obama answers about sex life with Barak Obama)

मिशेल बराक ओबामांना तो लाखमोलाचा सवाल

बराक ओबामांची पत्नी एवढीच मिशेल यांची ओळख नाही. त्या उत्तम कूक आहेत. त्याचे काही शोजही त्या करत असतात. जिम्मी किमेल(Jimmy Kimmel) यांच्या एका शोमध्ये त्या स्वत:चा शो Waffels+Mochi चं प्रमोशन करण्यासाठी आल्या होत्या. आता समोर पाहुण्या मिशेल म्हटल्यानंतर जिम्मीना प्रश्न विचारण्याची घाई तर होतीच पण मनातला प्रश्न विचारल्याशिवाय ते शांतही होणार नव्हते. काही प्रश्न झाल्यानंतर जिम्मीनं बाँबगोळा टाकला. तो म्हणाला, मी आधीही हा प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि आता पुन्हा विचारतो आहे, ज्या दिवशी नेव्ही सील बराक ओबामांच्या आदेशावर ओसामा बिन लादेनचा खात्मा केला त्यादिवशी तुम्ही त्यांच्यासोबत लव्हमेकिंग(सेक्स) केला का? आता एवढ्या खासगी प्रश्नावर मिशेल काय उत्तर देणार म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. मिशेल यांच्या चेहऱ्यावर मात्र कुठलाही अवघडलेपणा नव्हता. त्यांनीही त्याच बेबाक अंदाजात, प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.