म्यानमारमध्ये लष्कराच्या गोळीबारात 18 आंदोलकांचा मृत्यू | Military firing kills 18 protesters in Myanmar

Share This News

यंगून : 

म्यानमारमधील लष्करशाही विरोधात आंदोलन करणाऱ्या जमावावर रविवारी लष्कराने केलेल्या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण जखमी झाले आहेत.

म्यानमारमधील लष्कराने 1 फेब्रुवारीला लोकशाही सरकार उलथवून लावत एकहाती सत्ता हाती घेतली. लष्कराच्या या बंडाला देशभरातून कडाडून विरोध सुरू असून, सातत्याने या देशात लष्करविरोधी आंदोलने सुरू आहेत. यांगून, दवेई आणि मंडाले हे शहरे आंदोलनाचे केंद्र बनले आहेत. याच शहरांमध्ये आंदोलनकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. 
आंदोलनकर्त्यांविरोधात पोलीस अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गोळ्यांचा वापर करत आहेत.

पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधातील हिंसेचा वापर तात्काळ बंद करावा आणि लष्कराने अनधिकृतपणे हाती घेतलेली सत्ता पुन्हा आंग सांग स्यु की यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी आंदोलनकर्ते करत आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.