चार महिन्यांच्या बाळाला आरपीएफने तत्परता दाखवत दूध पुरविले.

Share This News

Milk Given By Railway Police Force To 4 Months Old Baby In Running Train

धावत्या रेल्वेत दुधासाठी व्याकुळ होऊन मोठ्याने रडणाऱ्या एका चार महिन्यांच्या बाळाला आरपीएफने तत्परता दाखवत दूध पुरविले. दुधाने भूक शमल्याने ते शांत झोपले. त्याच्या पालकांनी आरपीएफच्या या कार्याची प्रशंसा करीत रेल्वेमंत्र्यांना ट्विट करून त्यांचे आभार मानले.

बऱ्हाणनपूर मध्यप्रदेशातील पंजवानी हे व्यापारी आहेत. बिलासपूरला नातेवाइकांकडे कार्यक्रम असल्याने पंजवानी आणि त्यांची पत्नी चार महिन्यांच्या बाळासह गेले होते. कार्यक्रम आटोपून ते ०२८१० हावडा-मुंबई मेलने परत निघाले. ए२ कोचमधून बिलासपूर ते भुसावळ असा प्रवास करीत होते. गोंदियापुढे गाडी निघाल्यानंतर बाळ रडायला लागले. काही केल्या त्याचे रडणे थांबत नव्हते. सर्व प्रयत्न करूनही बाळ शांत होतच नव्हते. बाळाला भूक लागली होती. त्याला दुधाची गरज होती. मात्र, पंजवानी दाम्पत्याकडे असलेले दूध खराब झाले होते. शिवाय पेंट्रीकारमध्येही दूध उपलब्ध नव्हते. त्याच वेळी मोतीबाग ठाण्याचे निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वातील पथक पूनम सांगवान, मेघा सिंह यांच्यासह चार जवान याच गाडीत कर्तव्यावर होते. त्यांनी पंजवानी दाम्पत्याची विचारपूस केली. बाळाला जवळ घेतले. काही वेळ खेळवले. पण बाळ रडणे थांबवायला तयार नव्हते.

 आरपीएफ जवानांनी लगेच रेल्वे नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. तसेच पंजवानी कुटुंबीयांनी १८२ वर कॉल केला. त्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवान दूध घेऊन तयार होते. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी येताच बाळासाठी दूध देण्यात आले. ते प्यायल्यानंतर बाळ शांत झोपले. आरपीएफचे मदतकार्य पाहून पंजवानी यांनी लगेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल आणि आरपीएफ डीजी यांना टविट् करून आभार मानले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.