छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

Share This News

नाशिक: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी काल खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार सरोज आहेर यांच्या लग्नास उपस्थितीती लावली होती. तसेच त्यांनी काल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची व नाशिक जिल्हा कोरोना आढावा बैठक घेऊन माध्यमांशी संवाद देखील साधला होता


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.