महाराष्ट्रातील मंत्री बेपत्ता, सगळेच अनभिज्ञ

Share This News

नागपूर : परळी येथील पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले संजय राठोड महाराष्ट्राचे वनमंत्री असताना बेपत्ता झाले आहेत. राज्यातून एक कॅबिनेट मंत्री अचानक गायब होतो आणि सत्ताधाऱ्यांना त्याबद्दल काहीच कसे माहिती नसते, याबद्दल राजकीय वर्तुळासह सामान्यही आता आश्चर्य व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे राठोड आपल्या वनमंत्री पदाचा राजीनामा शिवसेनेचा गढ असलेल्या मातोश्रीवर पाठवितात. मात्र त्यांचा राजीनाम घेऊन येणाऱ्या व्यक्तीलाही राठोड कुठे आहेत, याबद्दल माहिती नसते. त्यामुळे ‘राठोड है कहा?’ असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याप्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने ते एका रात्रीतून गायब झालेत. कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांना पोलिसांचे सुरक्षा कवच होते. या कवचातून मंत्री महोदय गायब कसे झालेत, असा प्रश्न महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने तर उपस्थित केला आहेच शिवाय सामान्यांनाही हे कोडे पडले आहे.

विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राठोड यांनी मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर त्यांच्याकडे नागपूरच्या संपर्कमंत्रिपदाची सूत्रे आलीत. त्यामुळे राठोड यांचे राजकीय वजन विदर्भात चांगलेच वाढले. मात्र अचानक ओढवलेल्या संकटामुळे राठोड एकाएकी बेपत्ता झालेत. गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना राठोड कुठेय असा प्रश्न प्रसार माध्यमांनी केला. मात्र कुणाजवळच ठाम उत्तर नव्हते. मंगळवारी मुंबईत शिवसेनेची उच्चस्तरीय बैठक झाली. त्यातही राठोड नव्हते. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीतही ते दिसेल नाहीत. त्यांचे स्वीय सहाय्यक, विशेष कार्य अधिकारी इतकेच नव्हे तर त्यांच्या जवळच्या विश्वासू कार्यकर्त्यांनाही राठोड कुठे आहेत, हे माहिती नाही. त्यामुळे एक मंत्री बेपत्ता झाला आणि कुणालाच त्याचे कसे देणेघेणे नाही असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.