मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त

Share This News

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. पासपोर्ट जारी करताना देण्यात येणाऱ्या माहितीत वडेट्टीवार यांनी त्यांच्यावरील दाखल गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांच्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा स्थायी निवासाचा पत्ता दिला होता. याकरिता तेथील पोलीस स्टेशन मधून त्यांनी एनओसी प्राप्त केली होती. त्यासाठी त्यांच्यावर कुठलेही गुन्हे दाखल नसल्याची माहिती दिली होती. यावर मितेश भांगडिया यांनी आक्षेप घेतला होता व याबाबतची तक्रार पासपोर्ट कार्यालयात केली होती. सोबतच या प्रकरणी भांगडिया कोर्टात गेले व कोर्टाच्या निर्देशानुसार पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त केल्याची माहिती आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.