महाराष्ट्रात 31 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम राहणार
मुंबई, 30 डिसेंबर : इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणुच्या दुस-या स्ट्रेनचा भारतात प्रादुर्भाव होतोय. या नव्या स्ट्रेनच्या विषाणुचा महाराष्ट्रात फैला व होऊ नये म्हणून राज्य सरकारने आगामी 31 जानेवारीपर्यंत “मिशन बिगीन अगेन” लागू राहणार असल्याची घोषणा केलीय. राज्य सरकारकडून यासंदर्भात अधिकृत आदेश प्रसिद्द करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सराकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबर रोजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स 31 जानेवारीपर्यंत लागू राहतील असे राज्य सरकारने स्पष्ट केलेय. या नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत. राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असे सांगितले जात असले तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात 31 जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असे स्पष्ट केलेय.