गुन्हा रद्द करण्यासाठी आमदार नागपूर हायकोर्टात MLA in Nagpur High Court to quash the crime

Share This News

नागपूर : निवडणूक काळात साड्यांचे वाटप करण्यात आल्याच्या आरोपांवरून अडचणीत सापडलेले अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. सरनाईक व त्यांचे सहकारी निवडणूक काळात साड्यांचे वाटप करीत होते, असा आरोप त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांवर लावण्यात आला आहे. याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सरनाईक यांनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने सरनाईक यांची याचिका दाखल करून घेत याप्रकरणी आर्णी पोलिसांना उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.