ओबीसी संघर्ष कृती समितीच्या कार्यालयाला आ.वजांरींची भेट

Share This News

गोंदिया: नागपूर विभागीय पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित वंजारी आणि गडचिरोलीचे माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ओबीसींची स्वतंत्र जनगणना या मुद्यावर तसेच आंदोलनाची दिशा काय राहील यावर चर्चा करण्यात आली. यावेळी ओबीसी कृती समितीचे जिल्हाध्ङ्मक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, महासचिव शिशिर कटरे, कैलास भेलावे,बेरार टाईम्सचे सपांदक व मार्गदर्शक खेमेंद्र कटरे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रा. संजीव रहांगडाले, विद्यार्थी सचिव गौरव बिसेन, चंदू बहेकार, पप्पू पटले बाळकृष्ण कावडे, प्यारेलाल तुरकर, राजेश वाधवानी, एकनाथ हत्तीमारे, प्रेमलाल गायधने व ताकसांडे व इतर मंडळी उपस्थित होते.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.