मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता | Mobile prices likely to go up

Share This News

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आल्याची घोषणा केली. मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मोबाईलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  मोबाईल उपकरणांवर आता २.५ टक्के कस्टम ड्युटी लागू केली जाणार आहे. त्यानंतर आता मोबाईल आणि चार्जर महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक उपकरणंही महाग होण्याची शक्यता आहे. ऑटो पार्ट्सवरही कस्टम ड्युटी वाढवून ती १५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांचे सुटे भाग महाग होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉपर आणि स्टीलवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. तर सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटीही कमी करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. १ ऑक्टोबर २०२१ पासून देशात हे लागू केलं जाणार आहे. दरम्या काही वस्तूंवर अॅग्रीकल्चरल सेसदेखील लावला जाणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.