मोबाईल टेस्ट लॅब नागपुरात दाखल

Share This News

नागपूर
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विनंतीनुसार ‘स्पाईस हेल्थ’च्या वतीने आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठीची मोबाईल टेस्ट लॅब नागपूरमध्ये दाखल झाली आहे.
या लॅबद्वारे ४२५ रुपयांत प्रतिदिन २५00 लोकांची टेस्ट केली जाणार आहे. तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब सुरू होईल. नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक चाचण्या व्हाव्या व लवकरात लवकर रिपोर्ट मिळावे, यासाठी ही टेस्ट लॅब उपयोगी ठरणार आहे.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.