मोदींनी शेतकऱ्यांप्रती भावूकपणा दाखवावा- अजित पवार
नाशिक विभागाच्या वित्त नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकमधील सर्व विभागांना योग्य निधी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. दरवर्षी सर्व विभागांना चांगला निधी देतो परंतु मागील वर्षी कोरोनामुळे टॅक्स रुपात राज्यातून येणारा तसेच केंद्रातून येणारा निधीवर विपरित परिणाम झाला आहे. आपल्या विभागाला जास्त निधी मिळावा असे पालमंत्र्यांना वाटणे सहाजिकच आहे.तसेच अजित पवार यांनी सांगितले सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाच्या वेळेत बदल करण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाब नवी आझाद यांच्याविषयी बोलताना भावूकपणा दाखवला तसाच भावूकपणा शेतकऱ्यांप्रती दाखवावा असे अजित पवार यांनी म्हटले आहे.