मुरादाबाद : ट्रक-बसच्या भीषण अपघात 10 जणांचा मृत्यू; 20 जखमी

Share This News

लखनऊ : 

उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी आयशर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. जखमींना कुंदरकी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

कुंदरकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक खासगी बस कुंदरकीहून प्रवाशांसह मुरादाबादला जात होती. बस नानपूर पुलाजवळ पोहोचताच समोरुन येणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. दरम्यान, तिसऱ्या एका वाहनानेही या बसला धडक दिली. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. 

मुरादाबादचे जिल्हा अधिकारी राकेशकुमार सिंह, एसएसपी प्रभाकर यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस अधीक्षक अमित आनंद यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयातील जखमींना भेटण्यासाठी धाव घेतली असून, मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.