विद्यार्थी कल्याण योजनांसाठी अधिक तरतूद
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी चार कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. प्रस्तावित अर्थसंकल्पात या योजनांसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात येणार असून, गतवर्षी तत्कालीन कुलगुरूंनी यासंदर्भात मान्यता दिली होती. गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय सभेत विद्यार्थी कल्याण योजनांवर अधिक निधी खर्च करण्याची मागणी अँड. मनमोहन वाजपेयी, विष्णू चांगदे आणि शीलवंत मेर्शाम यांनी केली होती. त्यानुसार तत्कालीन कुलगुरूंनी साडेसाच कोटींची तरतूद करण्यास मान्यता दिली होती. मात्र, यावर्षी त्यात तरतूद झाली की नाही याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य विष्णू चांगदे यांनी विचारणा केली. त्यानुसार प्रस्तावित अर्थसंकल्पात दुरुस्ती करण्याची मागणी केली. यानंतर विद्यापीठाच्या अंतर्गत स्टेडियमची फेरमान्यता घेण्यासाठी राज्यपालांना प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. त्यामुळे त्यासाठी त्यासाठी विद्यापीठाने ५ कोटींची तरतूद केली आहे.