गडचिरोलीतील लग्नात दीडशेपेक्षा जास्त वऱ्हाडी; वधू-वरांचे पालक, आचाऱ्याविरोधात गुन्हा

Share This News

गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मरकेगाव या ठिकाणी लग्न सोहळ्याला २५ हून अधिक व्यक्ती आढळून आल्याने स्थानिक कृती समितीने वधूवरांच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
लग्न सोहळ्यात २५हून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास मनाई आहे. मात्र, या आदेशांचे उल्लंघन करत लग्न सोहळ्याला दीडशेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित आल्या होत्या. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आदी गोष्टी आढळून आल्याने स्थानिक कृती समिती, यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व इतर समिती सदस्यांनी वधू-वरांचे आई-वडील यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मरकेगाव येथे काल, शनिवारी लग्नसोहळ्यात कमाल २५ व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित होती. परंतु, गावपातळीवरील कृती समितीत असलेले धानोरा तलाठी व तुकूम ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत शिपाई यांनी पाहणी केली असता, या सोहळ्याला दीडशेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. वर व वधूच्या आईवडिलांसह आचाऱ्याविरोधात समिती सदस्यांनी धानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.