ग्रामीणमध्ये लसीकरण जास्त, शहरात कमी

Share This News

शहरात ५५८ तर ग्रामीणमध्ये ७४३ जणांचे लसीकरण

हरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, शहरात लसीकरणाची टक्केवारी कमी असून, त्या तुलनेत ग्रामीणमध्ये लसीकरणाची संख्या अधिक आहे.
मंगळवारी शहरातील १८ केंद्रांवर प्रत्येकी १00 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यात मेयोच्या केंद्रावर १६, डागा हॉस्पिटल १५, पीएमएच हॉस्पिटल १८, आयसोलेशन हॉस्पिटल ५६, ऑरेंज सिटी हॉस्पिटल ७0, वोक्हार्ट हॉस्पिटल २६, भवानी हॉस्पिटल ८, किंग्सवे हॉस्पिटल ३८, मेडिकल ए केंद्रात २९, मेडिकल बी केंद्रात २५, म्यूर मेमोरियल हॉस्पिटल १२, पीएमएच हॉस्पिटल ४६, आयजीआर ३८, पोलिस हॉस्पिटल ३७, सिम्स हॉस्पिटल २८, दंदे हॉस्पिटल ५५, इएसआयएस हॉस्पिटल ९ तर अँलेक्सिस हॉस्पिटल केंद्रावर ३२ जणांना लस देण्यात आली. अशाप्रकारे शहरात दिवसभरात ५५८ जणांना लस देण्यात आली आहे. ग्रामीण भागात १४ हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १00 जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. ग्रामीणमध्ये १४00 पैकी ७४३ जणांचे लसीकरण झाले. लसीकरणाची सरासरी टक्केवारी ५३ टक्के इतकी आहे. जामठा येथील लसीकरण केंद्रात १२७ जणांचे लसीकरण करण्यात आले. सावनेर ११0, रामटेक ९२, मौदा ९२, उमरेड ७८, पारशिवनी ६६, कळमेश्‍वर ४८,काटोल ४३, नरखेड ४३, कामठी १९, कुही १४, लता मंगेशकर हॉस्पिटल बी केंद्रात ६, लता मंगेशकर हॉस्पिटल केंद्र ४ तर भिवापूर येथील केंद्रात फक्त एका व्यक्तीने लस टोचून घेतली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.