निवडणुकीचं बाळकडू, दीड महिन्याच्या बाळासह आई अर्ज भरायला केंद्रावर

Share This News

नागपूर :  . जिकडे तिकडे अर्ज भरण्याची धावपळ सुरु आहे. उमेदवार आपल्या लवाजम्यासोबत मतदान केंद्रावर अर्ज भरण्यासाठी दाखल होतायत. अशातच आज नागपूरच्या एका केंद्रावर आपल्या दीड महिन्यांच्या बाळाला घेऊन एक महिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या होत्या.

“देवलामेटी गावचा विकास करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलीय. यंदा माझी मुलगी क्रिशिता माझ्यासोबत आहे. यावेळी निवडणुकीच्या आखाड्यात आम्ही नक्की बाजी मारु”, अशा भावना व्यक्त करत विजयाचा विश्वास महिला उमेदवार सपना नागपुरे यांनी व्यक्त केला.

“कोरोनाचा काळ असला तरी सर्व सूचनांचं पालन करुन आम्ही सर्वजण मतदान केंद्रावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलोय. अर्ज दाखल केला आहे. आता प्रचार आणि प्रत्यक्ष निवडणुकीची उत्सुकता असल्याचं” सपना नागपुरे म्हणाल्या.

स्थानिक भाजप आमदार समीर मेघे यांनी पुरस्कृत केलेल्या ग्रामविकास पॅनेलकडून संबंधित महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे. आतापर्यंत जेवढा विकास झाला नाही तेवढा इथून पुढच्या पाच वर्षात करु, असा मानस नागपुरे यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यातील 14 हजार 232 ग्रामंपचांयतीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. ग्रामंपचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज आणि जातपडताळणीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारण्यात येतील, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली. तर, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अर्ज भरण्याची मुदत तीन वरुन साडे पाच वाजेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही हसन मुश्रीफ यांनी दिली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.