सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत नरमले

Share This News

मुंबई: शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपवर जोरदार टिका केल्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा सूर सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर अचानक नरम पडला आहे. कोरोनाचे संकट युद्धापेक्षाही भयंकर असल्याने राजकीय फाटे फोडण्यापेक्षा सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करण्याची पाळी राऊत यांच्यावर आली आहे.
आजच खासदार राऊत यांनी मुखपत्रातून भाजपवर जोरदार टीका केली आहे.त्यानंतर काही तासातच राऊत यांच्यावर तलवार मान्य करण्याची पाळी आली आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. राऊत म्हणाले, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीत सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वांचे मत विचारात घेतले जाते. सरकार कमी पडत असेल तर सूचना कराव्या. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्राकडे मदतीसाठी पाठपुरावा करायला हवा, असेही राऊत म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.