खासदारांनी घेतला आरोग्य सेवेचा आढावा

Share This News

गोंदिया : आरोग्य विषयक सोयी सुविधा आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर गोंदिया मेडिकल कॉलेज आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदियाच्या संयुक्त आढावा बैठकीचे आयोजन खासदार सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली 1 एप्रिल रोजी करण्यात आले होते.
कोरोना काळात सामान्य रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधांचा आढावा यावेळी खासदारांनी घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेला निधी आणि झालेला खर्च याची माहिती जाणून घेण्यात आली. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय असून संक्रमण नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने असलेल्या उपाय योजनांची माहिती जाणून घेत त्या प्रभावीपणे अमलात आणल्या जाव्यात अशा सूचनाही खासदारांनी केल्या.
लसीकरणाचा विषय प्राधान्याने हाताळला जावा. 45 वयाच्या वरील प्रत्येकाचे लसीकरण होईल यादृष्टीने नियोजन करावे असेही खासदार यांनी सांगितले. बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या इमारतीचा विषय, रक्तपेढी साठी उपलब्ध नसलेल्या वाहनाचा विषय, सिटीस्कॅन यंत्र चालविणाऱ्या तंत्रज्ञा च्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील नर्सिंग शाळेत रिक्त असलेल्या पदांची भरती करण्यासंदर्भात ताबडतोब निर्णय घेण्यात यावा,रिक्त पदांमुळे रुग्णांचे हाल होणार नाही याची काळजी घ्यावी असेही यावेळी सांगण्यात आले. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याच्या सूचनाही यावेळी खासदारांनी दिल्या.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.