मुंबई अन् नागपूरचे नाते अधिक दृढ होईल; विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे
Mumbai-Nagpur relationship will be stronger; We will not allow injustice to happen to Vidarbha- Uddhav Thackeray
नागपूर: नागपुरात विधिमंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरु झाल्याने मुंबई व नागपूर हे एकत्र आले आहेत. हे नाते अधिकाधिक दृढ होईल. असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे कायमस्वरूपी कार्यालय नागपूरच्या विधानभवनात आजपासून सुरू झाले.
या कार्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन करताना ते बोलत होते. विदर्भवादी हे नेहमी माझ्या हृदयाजवळ आहेत. विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.